Dharwad

धारवाड : काँग्रेस नेते इस्माईल तमाटगार यांना जीवे मारण्याची धमकी; अंजुमन संघटनेचे आंदोलन

Share

धारवाड अंजुमन संघटनेचे अध्यक्ष इस्माईल तमाटगार यांना दिलेल्या जीवे मारण्याच्या धमकीचा निषेध करण्यासाठी आज सायंकाळी भव्य आंदोलन करण्यात येणार आहे.

काँग्रेस नेते इस्माईल तमाटगार यांना अंजुमन संस्थेजवळ काही अज्ञातांनी हल्ला करण्याचा कट रचला होता. मात्र याचवेळी ते बंगळुरूमध्ये असल्याने त्यांच्या भावाच्या घरी जाऊन धमकावण्यात आले आहे. या सर्व घडामोडींचा निषेध करण्यासाठी आज सायंकाळी धारवाडच्या प्रादेशिक मध्यवर्ती बसस्थानकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. अंजुमन संघटनेने हे आंदोलन आयोजित केले असून हत्येच्या कटात सहभागी असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

Tags: