Belagavi

बेळगावात चॅम्पियन्स ट्रॉफी फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ

Share

केएलएस गोगटे तांत्रिक महाविद्यालयात ‘चॅम्पियन्स ट्रॉफी २०२६ – सीझन २’ या आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ झाला.

या स्पर्धेत बेळगावमधील दहा महाविद्यालयीन संघ सहभागी झाले आहेत. डीसीपी नारायण भरमणी यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी प्राचार्य डॉ. विजय अठवले, प्रशासन विभागाचे अधिष्ठाता प्रा. दिगंबर कुलकर्णी आणि शारीरिक शिक्षण संचालक डॉ. जॉर्ज रॉड्रिग्ज उपस्थित होते.

खेळाडूंनी शिस्त आणि क्रीडाभावना जोपासावी, असे आवाहन मान्यवरांनी केले. युवा फुटबॉलपटूंना कौशल्य दाखवण्याची संधी मिळण्यासह महाविद्यालयांमध्ये क्रीडाविषयक सलोखा वाढवणे हा स्पर्धेचा उद्देश आहे.

Tags: