धारवाडमध्ये कामगार मंत्री संतोष लाड यांच्या हस्ते ध्वजारोहणाने आर. एन. शेट्टी स्टेडियमवर 78 वा स्वातंत्र्यदिन सोहळा पार पडला.
देशभरात 78 वा स्वातंत्र्यदिन जल्लोषात पार पडला. धरवाडमध्येही स्वातंत्र्यदिनानिमित्त कामगार मंत्री तथा धारवाड जिल्हा पालक मंत्री संतोष लाड यांच्याहस्ते ध्वजारोहण करून स्वातंत्र्यदिन सोहळा थाटामाटात पार पडला. यावेळी सैन्यदलातील जवानांनी तिरंग्याला मानवंदना दिली.
धारवाड जिल्हा प्रशासनाने शहरातील आर. एन. शेट्टी स्टेडियमवर ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या सोहळ्यात मंत्री संतोष लाड यांनी जिल्ह्यातील जनतेला संबोधित केले. यावेळी धारवाडच्या जिल्हाधिकारी दिव्या प्रभू, जिल्हा पंचायत सीईओ स्वरूप टीके, जिल्हा अधीक्षक डॉ. गोपाल ब्याकोड, हुबळी – धारवाड पोलिस आयुक्त एन शशीकुमार आदी उपस्थित होते.


Recent Comments