बोलेरो वाहनाने दुचाकीस्वाराला धडक दिल्याची घटना धारवाड येथील जुन्या डीवायएसपी सर्कलजवळ घडली असून, हे भीषण दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. या अपघातात धारवाड मडिहाळ येथील सिद्धरुद्ध कॉलनी येथील रोहित जगदीश कुंभार या २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला.

रोहित दुचाकी घेऊन रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगात आलेल्या बोलेरोने दुचाकीला धडक दिली. यात गंभीर जखमी झालेल्या रोहितचा जागीच मृत्यू झाला.

अपघात घडताच , चालक वाहनासहित पळून गेला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून याप्रकरणी वाहतूक स्टेशन पोलिसांनी तक्रार नोंदवून तपास सुरू केला आहे.


Recent Comments