नवलगुंद येथे आमदार एन. एच. कोनरेड्डी यांच्या उपस्थितीत मतदारसंघातील जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी जनता दर्शन कार्यक्रमाचे आयॊजन करण्यात आले होते.
नवलगुंद येथे आयोजिण्यात आलेल्या जनता दर्शन कार्यक्रमात आमदार एन. एच. कोनरेड्डी यांनी मतदार संघातील जनतेच्या समस्या जाणून घेत चर्चा केली. तालुका पंचायत कार्यालयाच्या आवारात जनता दर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी बहुसंख्य नागरिकांनी वैयक्तिक समस्यांसह नागरी समस्यांवर तोडगा काढण्याची विनंती केली. मतदार संघातील रस्त्यांवर मुसळधार पावसामुळे खड्डे पडले असून रस्त्याचे विकासकाम तातडीने हाती घेण्यात यावे अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली. यावेळी जनतेच्या तक्रारी आणि समस्या ऐकून तातडीने यावर कार्यवाही करण्याचे आश्वासन आमदारांनी दिले.


Recent Comments