सलग पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे अथणी तालुक्यातील कृष्णा नदीकाठाच्या गावांना पूर येण्याचा धोका निर्माण झाला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरवर्षी निर्माण होणाऱ्या या परिस्थितीला कंटाळून त्यांना अन्यत्र स्थलांतरित करून कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

मुसळधार पावसामुळे अथणी तालुक्यातील कृष्णा नदीच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली आहे. नदीकाठची अनेक गावे पाण्याखाली जाण्याचा धोका आहे. दरवेळी पावसाळ्यात ही परिस्थिती निर्माण होते. लोक व पशुधन संकटात सापडले आहेत . नदीकाठावर राहणाऱ्या नागरिकांना शासनाने कायमस्वरूपी दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी नेते महादेव मडीवाळ यांनी केली आहे.


Recent Comments