सततच्या मुसळधार पावसाने बेळगाव तालुक्यातील गोकाकमधील जनजीवन विकसलीत झाले आहे. रहिवासी भागात पाणी शिरत असल्याने पोलिस विभागासह अधिकाऱ्यांचे पथक नदीकाठच्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवत आहे.

गोकाक तालुक्यात यापूर्वीच अनेक पूल पाण्याखाली गेले असून, जत जांबोटी राज्य महामार्ग , संकेश्वर-गोकाक यांना जोडणाऱ्या लोळसुर पुलावर घटप्रभा नदीचे पाणी वाहत असल्याने पोलीस विभागाने हा पूल वाहतुकीसाठी बंद केला आहे . बॅरिकेड्स लावून वाहने अडवली आहेत. पावसाचा जोर वाढल्याने गोकाक-कोण्णूर ला जोडणाऱ्या चिक्कहोळी पुलावरून देखील पाणी भरून वाहत आहे . गोकाक तालुक्यात पुराचा धोका निर्माण झाला असून, रहिवासी भागात पाणी शिरले आहे.पोलिस विभागासह अधिकाऱ्यांचे पथक नदीकाठच्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवत आहे

शहरातील डाळिंबाची बाग , जुन्या धनद पेठे या भागातील लोकांना आधीच सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून, भोजगार गल्ली, कुंभार गल्ली, मटण मार्केट यासह इतर रहिवासी भागातील लोकांना अधिकारी बाहेर काढत आहेत आणि लोकांना सुरक्षित स्थळी पाठवत आहेत. शहरातील शासकीय पदवीपूर्व कॉलेजमध्ये उभारण्यात आलेल्या काळजी केंद्रामध्ये लोक आसरा घेत आहेत . गोकाक तालुक्यातील कुंदरगी , पाश्चापूर गावात मार्कंडेय नदी तसेच बळ्ळारी नाला तसेच आडीबट्टी चिगडोळी , उदगट्टी गावात घटप्रभा नदी दुथडी भरून वाहत असल्याने लोक जवळपास असलेल्या काळजीकेंद्रांमध्ये आणि नातेवाईकांच्या घरी जात आहेत. हिडकल जलाशयातून अधिक पाणी सोडल्यास मेळवंकी, हडगीनाळ आणि कलारकोप्प येथील ग्रामस्थांनाही स्थानिक ग्रामपंचायतींनी सुरक्षित ठिकाणी पाठवले आहे.
अगोदरच हिडकल जलाशयातून 40 हजार क्युसेक, हिरण्यकेशी नदीतून 23 हजार क्युसेक, मार्कंडेय नदी आणि बेल्लारी कालव्यातून 10 हजार क्युसेक पाणी घटप्रभा नदीत वाहत असून, पूरस्थिती निर्माण झाल्याने, नदीकाठच्या लोकांना सुखरूप बाहेर काढून त्यांचे स्थलांतर केले जात आहे .


Recent Comments