Athani

कृष्णा नदी काठाच्या लोकांचे स्थलांतर

Share

महाराष्ट्रातील पश्चिम घाटात मुसळधार पावसामुळे धोक्याची पातळी ओलांडून वाहत असलेल्या कृष्णा नदीच्या काठावरील लोकांना अधिकाऱ्यांनी स्थलांतरित केले आहे.

सध्या कृष्णा नदीत 1,75,000 क्युसेकने विसर्ग सुरू असल्याने नदीकाठच्या नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील हुलगबाळ गावातील मांग बागेतील घराना अथणी तालुकाधिका-यांनी भेट दिली .

अथणी डीवायएसपी श्रीपाल जलदे यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करण्यात आली . नदीकाठच्या लोकांना आधीच घरातील सामान आणि गुरे खाली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जनतेची समजूत काढण्यासाठी पोलिसांनी विविध गावांना भेटी दिल्या आहेत .
जनतेनेही स्थलांतरासाठी प्रतिसाद दिला .

Tags: