धारवाड तालुक्यातील अम्मिनभावी गावाजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.
दयामण्णा इंचल (४०) असे दुर्दैवी दुचाकीस्वार असून या अपघातात त्याचा मृत्यू झाला आहे. दयामण्णा हे धारवाडहून अम्मिनाभावी गावाकडे दुचाकी घेऊन जात असताना अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. यामुळे दयामण्णाचा जागीच मृत्यू झाला. दयामण्णाचे कुटुंबीय त्यांच्या मृतदेहासमोर आक्रोश करतानाचे दृश्य हृदय पिळवटून टाकणारे होते.
धारवाड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला.


Recent Comments