Dharwad

धारवाडमधील खासगी रुग्णालयात जवानाचा मृत्यू

Share

धारवाडमधील एका बीएसएफ जवानाचा आजारपणामुळे एका खासगी रुग्णालयात मृत्यू झाला.

बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती येथील मंजुनाथ कुंदरगी (३३) यांचा मृत्यू झाला आहे. 4 जुलै रोजी मंजुनाथ रजेवर गावी आले होते. ओरिसात ड्युटीवर असलेले मंजुनाथ रजेवर घरी आले असता त्यांना ताप आला. उपचारासाठी सौंदत्ती येथील स्थानिक रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले.

मात्र, उपचाराचा फायदा होत नसल्याने त्यांना धारवाड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र याठिकाणीही उपचाराचा फायदा न होता आज त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर उद्या संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Tags: