Dharwad

गोवा बनावटीच्या मद्यामध्ये भेसळ करून नामांकित कंपनीच्या नावे मद्यविक्री करणारी टोळी गजाआड

Share

परराज्यातून बेकायदेशीररीत्या आणलेल्या दारूमध्ये रसायन मिसळून नामांकित कंपनीच्या नावाने दारू तयार करून विक्री करणाऱ्या नेटवर्कचा पर्दाफाश करण्यात धारवाडच्या कलघटगी पोलिसांना यश आले आहे.

कलघटगी पोलीस ठाण्याचे निरीक्षक निरीक्षक श्रीशैल कौजलगी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने धारवाड जिल्ह्यातील कलघटगी तालुक्यातील मिश्रीकोटी क्रॉसजवळील एका गोदामावर छापा टाकून ३३ लाख रुपयांची दारू जप्त केली.

या प्रकरणातील चारही आरोपी हुबळी येथील असल्याची माहिती असून हे आरोपी गोव्यातून परराज्यात दारू आणून त्यात आणखी एक रसायन मिसळून प्रतिष्ठित मद्य कंपनीच्या नावाने कोठे विकत होते, याचा तपास पोलिसांनी तीव्र केला आहे. . याप्रकरणी कलघटगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Tags: