धारवाड जिल्ह्यात डेंग्यूची भीती पसरली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये डासांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ग्रामपंचायतीकडून फॉगिंगचे काम जोमाने सुरू आहे.
धारवाड जिल्ह्यातील नवलगुंद तालुक्यातील बल्याळ, मानसी व इतर गावांमध्ये ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील गल्लीबोळात फॉगिंग करून डासांचे निर्मूलन करण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या. जिल्ह्यात यापूर्वीच डेंग्यूचे 30 हून अधिक सक्रिय रुग्ण आढळून आले असून, जिल्हा प्रशासनाने डेंग्यू ताप आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला आहे.


Recent Comments