श्रीराम सेना प्रमुख प्रमोद मुतालिक, सिद्धलिंग स्वामी यांच्यासह अनेक जणांचे फेसबुक अकाउंट ब्लॉक करण्यात आले आहेत अशी माहिती श्रीराम सेना राज्य कार्याध्यक्ष गंगाधर कुलकर्णी यांनी दिली असून याप्रकरणी राज्य सरकार आणि फेसबुक ऍथॉरिटी विरोधात त्यांनी संतापव्यक्त केला आहे.
धारवाडमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, लव्ह जिहाद विरोधात फेसबुक अकाऊंटच्या माध्यमातून जोरदार मोहीम सुरु करण्यात आली होती.. या मोहिमेला चांगला पाठिंबाहि मिळाला. यामुळे ही मोहीम दडपण्यासाठी फेसबुकने खाती ब्लॉक केली आहेत. यामागे सरकार किंवा अन्य कोणाचे तरी षडयंत्र असू शकते. 18 जिल्हाध्यक्ष आणि विभागप्रमुखांचे फेसबुक खाते ब्लॉक करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली.
आमचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा हा प्रकार असून हे कृत्य सरकारने केले असेल तर ते का केले याचे कारण द्यावे. फेसबुकच्या अधिकाऱ्यांनी तसे केले असेल तर सरकारने त्यांच्यावर कारवाई करावी. आयटी विभागाचे मंत्री प्रियांका खर्गे यांनी देखील या प्रकाराकडे लक्ष पुरवावे, अशी मागणी गंगाधर कुलकर्णी यांनी केली.


Recent Comments