anniversary

कै. श्री नाथाजीराव हलगेकर यांच्या पुण्यस्मरणनिमित्त हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी भव्य आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा

Share

बेळगाव येथील मराठा मंडळ ही शिक्षण संस्था आजवर नानाविध लोकाभिमुख उपक्रम राबवत आली आहे. संस्थेचे तत्कालिन अध्यक्ष कै श्री नाथाजीराव गुरूअण्णा हलगेकर यांनी काटकसर करून संस्थेचा शैक्षणिक आलेख उंचावत ठेवला. शिक्षण संस्था सर्वांगाणं वाढली पाहिजे यासाठी त्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले. बघता बघता या संस्थेचे रूपांतर शिक्षणाची अनेक दालणे निर्माण करणाऱ्या व आधुनिकतेची कास धरणाऱ्या शिक्षण संस्थेत झाले.

आज ही संस्था मराठा मंडळाच्या कल्पक अध्यक्षा डॉ. राजश्री नागराजू यांच्या नियोजनबद्ध शैक्षणिक वाटचालीत झपाट्याने गतीमान होताना दिसते आहे.
22 जूलै हा कै. श्री नाथाजीराव गुरूअण्णा हलगेकर यांचा पुण्यस्मरण दिन, शिक्षणाच्या कक्षा रूदांवाव्यात म्हणून प्रतिकूल परिस्थितीत झगडणाऱ्या बहुआयामी नेतृत्वाचा हा पुण्यस्मरण दिवस शैक्षणिक उपक्रम दिन म्हणून गेली अठरा वर्षे साजरा करण्यात येत आहे . याचं दिनाचे औचित्य साधून शैक्षणिक शिबिरे, नामांकित शिक्षणतज्ज्ञांची व्याख्याने, विद्यार्थी व शिक्षक भाषण स्पर्धा, शैक्षणिक तंत्रज्ञानाशी निगडीत गोष्टी यावर चर्चा सत्रांचे आयोजन अशा विविधांगी गोष्टींचा अंतर्भाव आजवर पुण्यस्मरण दिनी करण्यात आला आहे.

यावर्षीही विद्यार्थ्यांच्या संभाषण कलेला वाव देण्यासाठी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी भव्य अशा आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन रविवार दिनांक 14 जूलै 2024 रोजी सकाळी ठीक 9:30 वाजता केले असून ही स्पर्धा तयारीच्या विषयाला जोडून आयत्या वेळी बोलण्याच्या विषयावर पूर्णतः अवलंबून असून या स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कमेसह आकर्षक बक्षिसेही दिली जाणार आहेत. तरी संबधित शिक्षक व मुख्याध्यापकांनी आपल्या विद्यार्थ्यांना या स्पर्धेत भाग घेण्यास उपकृत करावे असे आवाहन मराठा मंडळाच्या विद्यमान अध्यक्षा डॉक्टर राजश्री नागराजू यांनी केले आहे.

Tags: