Gokak

गोकाक मधील नवजीवन मॅटर्निटी नर्सिंग होमला आरोग्याधिकाऱ्यांची अचानक भेट

Share

गोकाक मधील नवजीवन मॅटर्निटी नर्सिंग होमला आरोग्याधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अचानक भेट देऊन गर्भलिंग चाचणी करणाऱ्या मशीन जप्त केल्या आहेत.

पीसीपीएनडीटी सक्षम अधिकारी प्रभावती फक्कीरपूर, बैलहोंगल उपविभागाधिकारी डॉ. विश्वनाथ भोवी, केपीएमई नोडल अधिकारी आणि बेळगाव जिल्हा कुटुंब कल्याण अधिकारी तसेच गोकाक तालुका आरोग्याधिकारी डॉ. मुत्तण्णा कोप्पद यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गोकाक मधील नवजीवन मॅटर्निटी नर्सिंग होमला भेट दिली.

यादरम्यान पीसीपीएनडीटी म्हणजेच प्रसुतीपूर्व गर्भलिंग चाचणी कायद्याचे उल्लंघन करण्यात आल्याचे निदर्शनात आले असून स्कॅनिंग मशीन आणि येथील खोली सील करण्यात आली आहे. याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून केपीएमई कायद्यांतर्गत निदर्शनात आलेल्या कमतरता लक्षात घेऊन नर्सिंग होम ला नोटीस बजावण्यात आली आहे.

Tags: