धारवाडमधील आदिशक्ती कॉलनी मधील मुदिहाळ येथील प्रभाग क्रमांक ५ मध्ये ड्रेनेज आणि गटारीच्या समस्यांनी डोके वर काढले असून या समस्येवर तातडीने तोडगा काढण्यात यावा अशी मागणी करत आमदार विनय कुलकर्णी यांना निवेदन सादर करण्यात आले.
धारवाड आदीशक्ती कॉलनी, वीरभद्र नगर मुदिहाळ येथील प्रभाग क्रमांक ५ मध्ये ड्रेनेज आणि गटारीच्या समस्येमुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. गटारातील पावसाच्या पाण्याचा निचरा न झाल्याने या भागातील घराघरात पाणी शिरत आहे. हि समस्या सोडविण्यासाठी काँग्रेस नेत्या गौरम्मा बलोगी आणि आदिशक्ती कॉलनीतील रहिवाशांनी आमदार विनय कुलकर्णी यांना निवेदन सादर केले.
यावेळी विनय बलोगी, कालमेश मल्लीगवाड, आशा कदम, शोभा करीसुब्बाणावर, विजयालक्ष्मी, श्रीदेवी आरेन्नावर, विद्या पुजारी, ईश्वर शिवळ्ळी आदी उपस्थित होते.
Recent Comments