बजरंग दलाचे कार्यकर्ते व प्राणीप्रेमींवर मुस्लिम तरुणांच्या टोळक्याने केलेल्या हल्ल्याचा निषेध करत आणि हल्लेखोरांना अटक करण्याची मागणी करत धारवाड येथील हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांसह बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यासमोर अचानक निदर्शने करून निषेध व्यक्त केला.
बंजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी व हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शहरातील उपनगर पोलिस ठाण्यासमोर अचानक निदर्शने करून बंजरंग दलाचे कार्यकर्ते सोमशेखर यांच्यावर मुस्लिम तरुणांनी केलेल्या हल्ल्याच्या विरोधात घोषणाबाजी करून संताप व्यक्त केला.
दरम्यान, प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना बजरंग दलाचे जिल्हाप्रमुख सिद्धू म्हणाले की, घटनेला तीन तास उलटून गेले आहेत, ही बाब उपनगर पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली असून तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र अद्यापपर्यंत एकाही हल्लेखोराला अटक करण्यात आलेली नाही. यातील पोलिसांची कारवाई पाहिल्यास संशय निर्माण होतो. आमच्या कार्यकर्त्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. अन्यथा आमचा संघर्ष अधिक तीव्र करू, असा इशारा त्यांनी दिला.
तसेच आंदोलनादरम्यान बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना खडसावले .


Recent Comments