Dharwad

रेणुकास्वामी हत्येप्रकरणी आरोपींना शिक्षा झाली पाहिजे : जगदीश शेट्टर

Share

रेणुकास्वामींची हत्या हे राक्षसी कृत्य आहे, या हत्येतील आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी प्रतिक्रिया बेळगावचे नूतन खासदार जगदीश शेट्टर यांनी व्यक्त केली.

खासदार जगदीश शेट्टर यांनी हुबळी येथे पत्रकारांशी बोलताना रेणुकास्वामीच्या हत्येप्रकरणी अभिनेता दर्शनच्या नावाचा उल्लेख केला. दर्शनच्या चाहत्यांनी ही हत्या केल्याचे वृत्त आहे, खून झालेले रेणुकास्वामी निर्दोष आहेत, त्यांच्या पश्चात एकुलता एक मुलगा आहे. शिवाय त्यांची पत्नी गर्भवती असल्याचेही त्यांनी सांगितले.

रेणुकास्वामी यांनी सोशल मीडियावर गैरवर्तन केले तर सायबर पोलिस स्थानक होते. या सर्वांना सोडून स्वत: कायदा हातात घेणे कितपत योग्य आहे? या हत्येतील आरोपी कितीही मोठा असला तरी त्याला कठोर शिक्षा झालीच पाहिजे आणि या घटनेतील त्यांची भूमिका तपास पूर्ण झाल्यानंतरच कळेल, असे शेट्टर म्हणाले.

काँग्रेसचे सरकार आल्यानंतर पाकिस्तान झिंदाबादचा नारा वाढत चालला आहे. बेळगाव न्यायालयाच्या आवारात आरोपी जयेश याने पाकिस्तान झिंदाबादचा नारा दिला हि बाब निषेधार्ह असल्याचे मत खासदार जगदीश शेट्टर यांनी व्यक्त केले.

Tags: