हुबळी धारवाडमध्ये गुन्हेगारी कृत्यांचे प्रमाण वाढल्यानंतर व त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी धारवाड पोलीस सतर्क झाले असून, आज पहाटे धारवाड येथील राउडीशीटर्सच्या घरी जाऊन त्यांना ताकीद देण्यात आली .

धारवाड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एसीपी बसवराज, पोलीस ठाण्याचे निरीक्षक विश्वनाथ चौगले यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी सकाळी सकाळीच राऊडी शीटर्सच्या घरांवर छापे टाकून त्यांना हद्दपार करण्याचा इशारा दिला . गुन्हेगारी कृत्यांमध्ये गुंतलेले आढळून आल्यास कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्ह्यातील पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे.


Recent Comments