केएसआरटीसी बसमधून प्रवास करणाऱ्या महिलावर्गामध्ये फ्री स्टाईल मारामारी झाल्याचा प्रकार बिदर मध्ये घडला आहे. राज्य सरकारने महिलांसाठी ‘शक्ती’ योजने अंतर्गत मोफत बसप्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

मात्र हि योजना सुरु झाल्यापासून महिलावर्ग बसप्रवासासाठी गर्दी करत असून यादरम्यान अनेक ठिकाणी बसमधील जागेसाठी भांडण सुरु असल्याचे प्रकार घडत आहेत. आज बिदर पासून कलबुर्गी दरम्यान धावणाऱ्या बसमध्ये दोन महिलांमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन झाले. बसमधील जागेसाठी सुरु झालेल्या वादात महिलांनी एकमेकींवर चप्पल उगारली आणि वादाला वाद वाढत गेल्याने महिलावर्गात जोरदार मारामारी झाली. हा सारा प्रकार बसमध्ये उपस्थित असणाऱ्या प्रवाशांच्या मोबाईलमध्ये कैद झाला आणि बघता बघता सोशल मीडियावर या साऱ्या प्रकारचा व्हिडिओदेखील वायरल झाला.
शक्ती योजने अंतर्गत प्रवास करणाऱ्या महिलावर्गामध्ये अनेक ठिकाणी असे प्रसंग घडत असून सरकारने देऊ केलेल्या मोफत बसप्रवासावर इतर प्रवाशांकडून ताशेरे ओढण्यात येत आहेत.


Recent Comments