Dharwad

नियंत्रण सुटून उलटलेल्या ट्रकने पेट घेतल्याने लाखो रुपयांचा माल जळून खाक

Share

चालकाचा मालवाहू वाहनावरील ताबा सुटल्याने लॉरी उलटली . लॉरीला आग लागून लाखो रुपयांचा माल जळून खाक झाल्याची घटना धारवाड येथील कलघटगी मार्गावरील कणवी होन्नापूरजवळ घडली.

धारवाड तालुक्यातील कणवी होन्नापूर गावातील धारवाड कलघटगी रोडवर हा अपघात झाला. मात्र या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. लॉरी चालक किरकोळ जखमी झाला असून त्याला स्थानिकांनी वाचवले आहे.
मोबाईलच्या बॅटरी आणि टीव्ही साहित्याने भरलेली एक लॉरी केरळहून दिल्लीकडे जात असताना मालवाहू वाहनाच्या चालकाचे नियंत्रण सुटले आणि लॉरी उलटली .

त्यानंतर अचानक आग लागली आणि वाहनातील साहित्याने पेट घेतला. या आगीत लॉरीतील बहुतांश साहित्य जळून खाक झाल्याचे सांगण्यात येत आहे. स्थानिकांच्या माहितीवरून अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी भेट देऊन आग विझवली. याप्रकरणी धारवाड ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

Tags: