धारवाड येथील कल्याणनगर रेल्वे पुलाजवळ आज दुपारी बैलहोंगल येथील तरुणाचा मृतदेह आढळल्याची घटना घडली असून पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला.

सदर मृतदेह बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील दोड्डावाड गावातील युवकाचा मृतदेह असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे . माहिती मिळताच विद्यागिरी पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली व स्थानिकांच्या मदतीने तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. सध्या पोलिसांना तरुणाची प्राथमिक माहिती मिळाली असून त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याची माहिती गोळा करत आहेत. याप्रकरणी विद्यागिरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे


Recent Comments