कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या धडकेत एका पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना धारवाड तालुक्यातील गरग गावच्या हद्दीत घडली.
29 वर्षीय रुद्रप्पा सिद्धनावर असे मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. तो KSISP पोलीस कर्मचारी होता. मृत रुद्रप्पा हा धारवाड उप कारागृहात कार्यरत होता. ही घटना उघडकीस येताच स्थानिक वाहनचालक पोलिस कर्मचाऱ्याच्या बचावासाठी आले . मात्र या धडकेमुळे रुद्रप्पाचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना गरग पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, स्थानिकांच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे.


Recent Comments