मेंढ्या चारण्यास गेलेल्या १५ वर्षीय मुलाचा अंगावर वीज कोसळल्याने मृत्यू झाल्याची घटना विजयपूर जिल्ह्यातील इंडी येथे गुरुवारी सायंकाळी घडली.
बिराप्पा निंगाप्पा अवरादी, वय १५ असे मृत मुलाचे नाव आहे. गुरुवारी संध्याकाळी तो मेंढ्या चारण्यासाठी शहराबाहेर गेला होता. विजेच्या कडकडाटासह झालेल्या वादळी मुसळधार पावसापासून बचाव करण्यासाठी तो एका झाडाखाली उभा राहिला होता. त्याचवेळी वीज अंगावर कोसळून त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूचे वृत्त समजताच कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. इंडी शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.


Recent Comments