Belagavi

बस्तवाड हायस्कूलमध्ये गणवेश आणि शैक्षणिक साहित्याचे वितरण

Share

मराठा मंडळ संचालित बस्तवाड हायस्कूलमध्ये १७ व्या वर्षाच्या दिवंगत सुवर्णाताई आर. मोदगेकर यांच्या स्मृती दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मोफत शालेय गणवेश आणि शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.

माजी ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल भावकाण्णा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिवंगत सुवर्णाताई रामचंद्रराव मोदगेकर यांच्या प्रतिमेचे त्यांचे सुपुत्र किरण मोदगेकर आणि रमेश मोदगेकर यांनी पूजन केले, तसेच दोन मिनिटांचे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापक विजय खांडेकर यांनी प्रास्ताविक केले. मराठा मंडळाचे उपाध्यक्ष रामचंद्रराव मोदगेकर हे १९९६ पासून आजतागायत दरवर्षी शाळेतील मुलांना देत असलेल्या निरंतर योगदानाचा या वेळी आवर्जून उल्लेख करण्यात आला.

या प्रसंगी रमेशराव मोदगेकर, निंगप्पा चौगुले, एसडीसी अध्यक्ष शिवाजीराव काकतकर, ग्रामपंचायत सदस्य रामा मंगेष काकतकर आणि अध्यक्ष विठ्ठल भावकाण्णा पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. शाळेचे शिक्षक परशुराम लोहार, सायली गुरव, मुक्ता पाटील आणि प्रमोद पाटील यांच्या विशेष परिश्रमामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला. भावकाण्णा पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर परशुराम लोहार यांनी आभार मानले.

Tags: