विद्याभारती जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेच्या विविध गटांमध्ये खानापूरच्या शांतिनिकेतन पब्लिक स्कूल, शिंदोळीच्या देवेंद्र जीनगौडा स्कूल आणि गणेशपूरच्या संत मीरा स्कूलच्या संघांनी उत्कृष्ट कामगिरी करत अंतिम फेरीत धडक मारली आहे.

संत मीरा स्कूल येथे आयोजित या जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला संत मीरा इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष डॉ. विजयकुमार गोवेकर, मुख्याध्यापिका आरती पाटील, चंद्रकांत पाटील, अनुराधा पुरी उपस्थित होते. मान्यवरांनी खेळाडूंची ओळख करून घेत आणि नाणेफेक करून या क्रीडा स्पर्धांचे औपचारिक उद्घाटन केले.

या प्रसंगी स्वाती सावंत, शिवकुमार, पूर्णिमा बाळेकाई, सुजित नेरुलकर, सूरज देसूरकर यांच्यासह क्रीडा शिक्षक श्रीकांत कांबळे, शुभांगी काकतकर, शिवकुमार सुतार, गंगा गानिकोप्प आणि सागर कोलेकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत पाटील यांनी केले, तर श्रीकांत कांबळे यांनी आभार मानले.


Recent Comments