केएलई काहेर संस्थेचे सहसचिव प्रा. डॉ. सुनील एस. जलालपुरे यांची केएलई संस्थेच्या मुख्य सचिवपदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

डॉ. जलालपुरे हे १९९८ पासून केएलई संस्थेत सेवा बजावत असून २०१३ पासून संस्थेचे आजीव सदस्य आहेत. २०२५ च्या जागतिक वैज्ञानिक निर्देशकांनुसार (Global Scientist Index) जगातील पहिल्या ५ टक्के वैज्ञानिकांमध्ये त्यांचा समावेश आहे. त्यांनी विविध राष्ट्रीय संस्थांकडून ४ कोटींपेक्षा जास्त रुपयांचे संशोधन अनुदान मिळवले आहे.

त्यांच्या या निवडीबद्दल केएलई विद्यापीठाचे कुलपती डॉ. प्रभाकर कोरे, कार्याध्यक्ष अमित कोरे आणि अध्यक्ष महांतेश कौजलगी यांच्यासह आद्यक्ष मंडळाने त्यांचे अभिनंदन केले आहे.


Recent Comments