उगादी अमावस्येला देवतेच्या पालखीसह नदीत स्नान करण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा विजयपूर जिल्ह्यातील कोल्लारजवळील कृष्णा नदीत बुडून मृत्यू झाला.
कारजोळ गावातील सुदीप (पप्पू) दोड्डमणी (12) आणि श्रीधर दोड्डमणी (10) अशी या मुलांची नावे आहेत. उगादी अमावस्याअसल्याने बबलेश्वर तालुक्यातील कारजोळ गावात हुचम्मा देवी जत्रा महोत्सव होता. देवीची पालखी घेऊन देवीचे स्नान करण्यासाठी कारजोळ गावातून ग्रामस्थ कृष्णा नदीवर गेले होते.
ही आई-वडिलांसोबत नदीवर गेली असताना ही दुर्घटना घडली आहे . पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन दोन्ही मुलांचे मृतदेह स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढले. ही घटना कोल्हार पोलिस ठाण्याच्या व्याप्तीत घडली.


Recent Comments