कलघटगी नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी दानेश्वरी पाटील दलितांचा अवमान करत असल्याचा आरोप करत कर्नाटक दलित संघर्ष समितीच्या सदस्यांनी आंदोलन केले.
धारवाड जिल्ह्यातील कलघटगी नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी दानेश्वरी पाटील या दलितांचा अवमान करत असल्याचा आरोप करत त्यांना तत्काळ बडतर्फ करण्यात यावे, अशी मागणी करत दलित संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी धारवाड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.
दानेश्वरी पाटील नगरपंचायतीत दलितविरोधी कारवाया करत आहेत, ही निंदनीय बाब आहे. त्या दलित समाजाच्या समस्यांना प्रतिसाद देत नाहीत. दलितांना सरकारी सुविधांपासून दूर ठेवले जात आहे. त्यामुळे दलितविरोधी वर्तन करणाऱ्या दानेश्वरी पाटील यांना तत्काळ बडतर्फ करण्यात यावे, असे निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला दिले. याकडे दुर्लक्ष झाल्यास तीव्र लढा देऊ, असा इशारा त्यांनी दिला.


Recent Comments