एकीकडे धारवाड लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. लिंगायत स्वामींचा राजकीय खेळ आता जोरात सुरू आहे. यातूनच मुरुगा मठाचे श्री मलिकार्जुन स्वामी यांनी आपल्याच भूमिकेशी फारकत घेऊन विधान केल्याने त्यांच्यावर राजकीय दबाव आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कालच धारवाड मुरुगा मठाचे श्री मलिकार्जुन स्वामी यांनी प्रसारमाध्यमातून असे म्हटले होते की, डिंगाळेश्वर स्वामीजी आणि धारवाड मुरुगा मठाचा काहीही संबंध नाही, पण आज आणखी एका निवेदन प्रसिद्धीस देऊन, आपण ते विधान दबावाखाली येऊन केल्याचे स्पष्टीकरण दिल्याने स्वामींच्या कृतीवर शंका उपस्थित केली जात आहे.
श्री मलिकार्जुन स्वामीजी यांनी धारवाड मुरुगा मठातून दुसरा मीडिया व्हिडिओ जारी केला आहे, काल आपल्यावर मीडिया रिलीज करण्यामागे दबाव होता. काही जण पत्र घेऊन मठात आले, त्यावर स्वाक्षरी घेतली आणि ते वाचण्याची मागणी केली. त्यामुळे समाजाच्या हितासाठी मी कालचे विधान आज परत घेत असल्याची माहिती स्वामीजींनी आज दिली. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले. गेल्या बुधवारी हुबळी येथील मुरू साविर मठात झालेल्या चिंतन बैठकीत मी सहभागी होऊन ठरावाला अनुमोदन दिल्याचेही स्वामीजींनी म्हटले आहे.


Recent Comments