Dharwad

तेगूर चेकपोस्टवर 4,97,600 रुपये त्याचप्रमाणे ३०० साड्या जप्त

Share

निपाणीहुन भद्रावतीकडे जाणाऱ्या केएसआरटीसी बसमधून विणकागदपत्रे नेण्यात येणारी 4,97,600 रुपये इतकी रक्कम तेगूर चेकपोस्टवर जप्त करण्यात आली .

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वत्र चेकपोस्ट उभारण्यात आले आहेत . मतदारांना आमिष दाखवण्यासाठी केली जाणारी पैसे तसेच अन्य वस्तूंची वाहतूक रोखण्यासाठी निवडणूक आयोगाने कठोर पावले उचलली आहेत . त्या दृष्टिकोनातून , उभारण्यात आलेल्या चेकपोस्टवर , राज्यातील तसेच परराज्यातील वाहनांची तसेच बसेसची देखील तपासणी करण्यात येत आहे .

धारवाड जवळ तेगूर चेकपोस्टवर निप्पाणीहून भद्रावतीला जाणाऱ्या केएसआरटीसी बसची तपासणी केली असता चिक्कमंगळूर येथील मसूद नामक व्यक्तीकडे विना कागदपत्रे 4,97,600 रुपये इतकी रक्कम आढळून आली .चौकशी केली असता लाकूड व्यापाऱ्यांचा हा पैसा असल्याचे त्याने सांगितले . मात्र या रकमेबाबत योग्य कागदपत्रे नसल्याने ती जप्त करण्यात आली .

त्याचप्रमाणे KA 22 ZD 8098 क्रमांकाच्या मारुती ओम्नी कारमधून योग्य बिले नसलेल्या ३०० साड्या जप्त करण्यात आल्या . प्रशांत नामक व्यक्ती या कारमधून साड्यांची वाहतूक करीत असताना तेगूर चेकपोस्टवर ही कारवाई करण्यात आली . चेकपोस्टवर तैनात पोलिसांनी हे वाहन आणि साड्या जप्त केल्या आहेत .

Tags: