Dharwad

धारवाड मतदारसंघात ज्येष्ठ मंत्री व्हर्सेस युवा नेता लढत

Share

देशभरात लोकसभा निवडणुकीची तयारी दिवसेंदिवस रंगत चालली आहे. धारवाड लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार म्हणून काँग्रेस हायकमांडने नवलगुंदचे युवा नेते विनोद असोटी यांचे नाव काल जाहीर केले. त्यामुळे भाजपतर्फे ज्येष्ठ मंत्री व्हर्सेस युवा काँग्रेस नेता अशी लढत धारवाड मतदारसंघात पहायला मिळणार आहे.

होय, धारवाड लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार प्रल्हाद जोशी जे गेल्या चार वेळा धारवाड मतदारसंघातून विजयी झाले असून पाचव्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेस कोणाला उमेदवारी देणार याबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली होती. आता काँग्रेसची तिसरी यादी काल, गुरुवारी जाहीर झाली असून, धारवाड मतदारसंघासाठी विनोद असोटी यांचे नाव अंतिम झाले आहे.

अगोदरच भाजप उमेदवार मतदारसंघात पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत सुटले असतानाच आता काँग्रेसचे उमेदवार विनोद असोटी यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. या दोघांपैकी मतदार कोणाच्या बाजूने उभे राहणार हे पाहणे बाकी आहे.

Tags: