Dharwad

भरधाव दुचाकी झाडाला धडकली : दुचाकीस्वार जागीच ठार

Share

धारवाडमधील सप्तपूरजवळ आज पहाटे दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटल्याने त्यांची इलेक्ट्रिक दुचाकी झाडावर आदळून तो जागीच ठार झाला .

सप्तपुर नगर मेन रोड, धारवाड येथे अहा पघात झाला असून मृत दुचाकीस्वाराचे नाव सत्तावीस वर्षीय साईराम जटमल्ली असे आहे. या घटनेला कारणीभूत इलेक्ट्रिक दुचाकीस्वाराचा वेग अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातानंतर नागरिकांनी दुचाकीस्वाराला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र काही उपयोग झाला नाही.

स्थानिकांच्या माहितीवरून वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला. पोलिसांनी मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठवून कायदेशीर कारवाई केली

Tags: