भाजप खासदार अनंतकुमार हेगडे यांच्या घटना बदलण्याच्या विधानाविरोधात काँग्रेस कार्यकत्यांनी धारवाडमध्ये तीव्र आंदोलन करून अनंतकुमार हेगडे यांची प्रतिमा जाळली.
नेत्यांनी काँग्रेस नेते रॉबर्ट यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेस कार्यकत्यांनी निदर्शने करत अनंतकुमार आणि भाजपविरोधात रोष व्यक्त केला. यावेळी अनंतकुमार यांच्या फोटोना काळया फुल्या मारून ते जाळले.
भाजप खासदार अनंतकुमार हेगडे हे वारंवार घटना बदलण्याबाबत वक्तव्ये करत आहेत. त्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला आदर्श संविधान दिले. देशातील सर्व जनतेला त्याचा आदर आहे. मात्र केवळ भाजप आणि अनंतकुमार घटना बदलाबाबत बोलत आहेत. यामुळे संविधानकार आंबेडकर आणि देशातील संविधानाचा आदर करणाऱ्या जनतेचा अपमान झाला आहे. याबद्दल त्यांनी तत्काळ जनतेची माफी मागून खासदारपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.


Recent Comments