धारवाड शहरातील महावीर कॉलनीत घरफोडी करणाऱ्या चार आरोपींना जेरबंद करण्यात शहर पोलीस ठाण्याच्या पोलिसांना यश आले आहे.

गेल्या वर्षी डिसेंबर 2023 मध्ये धारवाडच्या महावीर कॉलनीमध्ये घरफोडी करणाऱ्या चौघा घरफोडयांना शहर ठाण्यातील पोलिसांनी अटक केली
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडून 100 ग्रॅम सोने आणि 150 ग्रॅम चांदी जप्त केली आहे. एकूण अंदाजे 5 लाख 60 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी चोरट्यांकडून हस्तगत केला आहे.

आणखी चार आरोपींना अटक करण्यात आल्याने शहर ठाणे आणि विद्यागिरी पोलीस ठाण्यात चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले असून सध्या आरोपींना तुरुंगात टाकण्यात आले आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Recent Comments