कर्नाटक रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी धारवाड शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांवर कन्नड नामफलक लावण्यासाठी मोठी जागृती फेरी काढली.
करवे कार्यकर्त्यांनी आज धारवाडच्या मुख्य बाजारपेठेच्या रस्त्यांवर मोर्चा काढून दुकानदार आणि व्यावसायिकांना इंग्रजी फलक काढून 60 टक्के कन्नड फलक लावण्याची विनंती केली. काही कार्यकर्त्यांनी इंग्रजी फलक हटवण्यासाठी लाठ्याही आणल्या आणि ते फलक हटवायला निघाले. याला विरोध करणाऱ्या पोलिसांशी करवे कार्यकर्त्यांचा वादही झाला.

दुकानदार आणि व्यावसायिकांनी इंग्रजी नावाचे फलक काढून 13 मार्चपर्यंत 60 टक्के कन्नड पाट्या लावा, अन्यथा आम्हाला इंग्रजी पाट्या फाडून टाकाव्या लागतील, असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला.


Recent Comments