कार आणि ट्रॅक्टर यांच्यात झालेल्या धडकेत कारमधील एकाचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना धारवाड तालुक्यातील अम्मीनभावी गावाजवळ सौंदत्ती रोडवर घडली.
सौंदत्तीकडून धारवाडच्या दिशेने येणाऱ्या कारची सौंदत्तीकडे जाणाऱ्या ट्रॅक्टरला धडक बसली. यात कारमधील एका जागीच ठार झाला, तर सौंदत्ती यल्लम्मा देवीच्या दर्शनासाठी जाणारे ट्रॅक्टरमधील प्रवासी जखमी झाले. त्यापैकी तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना धारवाड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.


Recent Comments