Dharwad

धारवाडमध्ये आगीत गॅरेज भस्मसात

Share

धारवाड शहरातील मुरुघ मठाजवळील एका गॅरेजला अचानक आग लागून ते भस्मसात झाले.

धारवाड शहरातील मुरुघ मठाजवळील एका गॅरेजला अचानक आग लागली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा संशय आहे. अचानक आग लागून गॅरेजमधील साहित्य जळून खाक झाले. आजूबाजूच्या घरांनाही आग लागण्याचा धोका असल्याने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.

स्थानिकांच्या माहितीवरून घटनास्थळी दाखल झालेल्या धारवाड अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवण्यात यश मिळविले.

Tags: