Dharwad

धारवाडमध्ये प्रचंड जल्लोषात छत्रपती शिवरायांची जयंती

Share

विध्याकाशी धारवाडमध्ये प्रचंड जल्लोषात छत्रपती शिवरायांची जयंती साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त धारवाड जिल्हा प्रभारी मंत्री संतोष लाड यांच्या हस्ते शहरातील शिवाजी चौक येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.

धारवाडच्या शिवाजी चौकामधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला धारवाड जिल्हा पालक मंत्री संतोष लाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी मंत्री संतोष लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाच वेळा जयजयकार करत उपस्थितांमध्ये चैतन्य निर्माण केले. लोकांनीही छत्रपती शिवाजी महाराजांचा जोरदार जयघोष केला. मराठा विद्या प्रसारक मंडळ आणि धारवाड मराठा समाज संघटनेतर्फे भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत तरुण-तरुणी डीजेच्या तालावर बेधुंदपणे नाचत असल्याचे दृश्य होते.

शिवाजी महाराज जयंती उत्सवाचा एक भाग म्हणून धारवाड शहरातील विविध वसाहतींमधील मराठा संघटनांनी प्रात्यक्षिकांसह काढलेला मोर्चा लक्ष्यवेधी ठरला.

Tags: