धारवाडजवळील गुळेदकोप्प गावात बिबट्याचे दर्शन झाल्याने ग्रामस्थ चिंतेत आहेत.
इतके दिवस राज्याची राजधानी बेंगळूर आणि तुमकूरमध्ये दिसणारे बिबटे आता धारवाड जिल्ह्यातही दिसू लागले आहेत. बिबट्याच्या धावण्याच्या व्हिडिओने ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. धारवाड जिल्ह्यातील गुळेदकोप्प आणि माडीकोप्प या सीमावर्ती गावांमध्ये तीन बिबट्यांनी शेतकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
हालेतेगुरु, गुळेदकोप्प आणि माडीकोप्प परिसरात बिबट्या वावरत असल्याची खात्री ग्रामस्थांनी केली आहे. ग्रामस्थांच्या माहितीवरून वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. मात्र बिबट्याच्या वावरामुळे स्थानिक ग्रामस्थ चिंतेत आहेत.


Recent Comments