Dharwad

‘त्या’ हिंदू कार्यकर्त्यांची सुटका, माजी आ. अमृत देसाई यांनी केले स्वागत

Share

धारवाड तालुक्यातील तडकोड गावातील दंगलीप्रकरणी अटक करण्यात आलेल्या हिंदू कार्यकर्त्यांना जामीन मंजूर करण्यात आला असून सर्व हिंदू कार्यकर्त्यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली. माजी आमदार अमृत देसाई यांनी या कार्यकर्त्यांचे स्वागत केले.

तडकोड गावातील सद्दाम हुसेन या युवकाने अयोध्या राम मंदिराच्या फोटोवर हिरवा झेंडा, ओवेसीचा फोटो लावला होता आणि त्यांच्या व्हॉट्सॲप स्टेटसवर “ही इस्लामिक पॉवर” असा संदेश असलेला फोटो संपादित करून टाकला होता. त्यामुळे संतप्त झालेल्या हिंदू कार्यकर्त्यांनी तडकोड गावातील इदगाह भिंतीचा घुमट तोडून संताप व्यक्त केला.

त्यामुळे गरग पोलिसांनी काही हिंदू कार्यकर्त्यांना अटक करून मध्यवर्ती कारागृहात ठेवले होते. आज सर्व हिंदू कार्यकर्त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. त्यानंतर माजी आमदार अमृत देसाई यांनी स्वत: मध्यवर्ती कारागृहात जाऊन सुटका झालेल्या हिंदू कार्यकर्त्यांचे स्वागत केले.

Tags: