धारवाडच्या बाहेरील भागात मध्यरात्री दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांवर कारमधून आलेल्या अज्ञातांनी हल्ला केल्याची घटना घडली असून या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे.
धारवाडच्या बाह्य भागात रविवारी मध्यरात्री एकथरारक हत्याकांड घडले. दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांवर कारमधील अनेकांनी हल्ला केला. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून अन्य एक जण जखमी झाला आहे. अळणावर तालुक्यातील अरवटगी येथील कल्लनगौडा पाटीला याचा या हल्ल्यात मृत्यू झाला असून तडसिनकोप्प येथील सुनील जक्कन्नवर गंभीर जखमी झाला आहे. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या कल्लनगौडा पाटील याला हुबळीच्या किम्स हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला.
या दोघांच्या हत्येचा कट होता किंवा नाही तसेच ही हत्या कोणी केली हे समजू शकलेले नाही. विद्यागिरी स्टेशनच्या पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरु केला आहे.


Recent Comments