धारवाडमध्ये ॲसिड पिऊन पीडित असलेल्या तीन वर्षांच्या कोवळ्या मुलाच्या शस्त्रक्रियेसाठी कामगार मंत्री आणि धारवाड जिल्हा पालक संतोष लाड यांनी मदत केली आहे.

हुबळी येथील आमरान नामक महिलेचा मुलगा मोहम्मद अलमत याने चुकून ॲसिड प्यायले होते. त्यामुळे त्याची अन्ननलिका भाजल्याने तो अत्यवस्थ झाला आहे. याची माहिती मिळताच मंत्री संतोष लाड यांनी त्या मुलाच्या उपचारासाठी त्यांच्या फाऊंडेशनच्या माध्यमातून ५० हजारांची देणगी देऊन आदर्श कार्य केले आहे.



Recent Comments