शेतकऱ्यांसाठी सुगीचा सण म्हटला जाणारा नवीन वर्षाच्या सुरुवातीचा पहिला सण संक्रांति धारवाडमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
धारवाड शहरातील रंगायण परिसरात लोकसाहित्य संशोधन केंद्रातर्फे अनोख्या पद्धतीने संक्रांती सण साजरा करण्यात आला. उत्तर कर्नाटकाचे वैशिष्टयपूर्ण खाद्यपदार्थ महिलांनी खास बनवून आणि लोकगीते गाऊन आनंदोत्सव साजरा केल्याचे दिसून आले. कडक रोटी, विविध प्रकारच्या भाज्या, गोड फराळ पाहून सर्वांच्या तोंडाला पाणी सुटले होते.

संक्रांती सणाची पूजा करताना लोकसाहित्य संशोधन केंद्राच्या महिला सदस्यांनी संक्रांती सणानिमित्त वैशिष्ट्यपूर्ण लोकगीते गाऊन सण साजरा करत लक्ष वेधून घेतले. याबाबत लोककथा संशोधन केंद्राच्या सदस्या आशा यांनी अधिक माहिती दिली.


Recent Comments