Dharwad

धारवाड येथील कापड व्यावसायिकाची फसवणूक

Share

मुंबईतील एका भामट्याने धारवाडमधील व्यापाऱ्याला 1 लाख 16 हजार रुपयांची मखमली टोपी घातल्याची घटना घडली आहे.

मुंबईतील एका व्यक्तीने धारवाड येथील एका कापड व्यापाऱ्याला त्याचे पैसे लुटून फसवणूक केल्याची घटना घडली आहे. धारवाड येथील महांतेश पट्टणशेट्टी या कापड व्यापाऱ्याची फसवणूक करण्यात आली आहे. धारवाडच्या संगम सर्कलमध्ये कपड्यांचे दुकान असलेल्या महांतेशची मुंबईतील मनीष नामक एका व्यक्तीशी ओळख होती.

आपण घाऊक कपड्यांचा व्यापारी असल्याचे सांगत त्याने महांतेशला आपली ओळख करून दिली व आपण घाऊक दरात कपडे पाठवतो असे सांगितले. त्यानंतर त्याने महांतेशला 1 लाख 16 फोन पे कर असे सांगितले. महांतेशने पैसे पाठवल्यावर आपला मोबाईल बंद करून आता महांतेशची फसवणूक केली आहे.

महांतेश वेगवेगळ्या ठिकाणाहून कपडे बुक करून आपल्या दुकानात आणायचा. मनीषचाही असाच प्रकार असू शकतो, असे समजून महांतेशने विश्वासाने पैसे पाठवले होते. आता त्याने सायबर क्राइम पोलिस ठाण्यात मनीषविरुद्ध फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. बाइट

Tags: