Dharwad

आयुष्याला कंटाळून तलाठ्याची गळफास घेऊन आत्महत्या

Share

वैयक्तिक कारणामुळे आयुष्याला कंटाळलेल्या तलाठ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना धारवाड जिल्ह्यातील नवलगुंद येथे घडली आहे.

वैयक्तिक कारणामुळे आयुष्याला कंटाळलेल्या तलाठ्याने गळफास घेऊन जीवन संपविले. ही खळबळजनक घटना नवलगुंद येथे घडली. शहरातील गणेश कॉम्प्लेक्समधील एका भाड्याच्या घरात 45 वर्षीय महेश मंत्री यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. नरगुंद तालुक्यातील हदली गावातील महेश मंत्री हे शिरूर, गुमगोळ, बाल्याळ गावचे ग्राम लेखापाल म्हणून कार्यरत होते.

काल बुधवारी दुपारी 2 वाजता घरी कोणी नसताना त्यांनी घराच्या दरवाजाला आतून कडी लावून गळफास घेत जीवन संपविले. मात्र त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.

Tags: