बेळगाव येथील केएलई डॉ संपतकुमार एस शिवनागी कॅन्सर हॉस्पिटलमध्ये अत्यंत गुंतागुंतीची मानली जाणारी बोन मॅरो ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे. डॉ अभिलाष आणि त्यांच्या वैद्यकीय पथकाने ही कामगिरी केली असून यामुळे रुग्णाला नवजीवन मिळाले आहे.

रक्ताच्या कर्करोगासह इतर गंभीर आजारांवर अत्यंत प्रभावी मानली जाणारी बोन मॅरो ट्रान्सप्लांट प्रक्रिया केएलई रुग्णालयात यशस्वी पूर्ण झाली. डॉ अभिलाष यांच्या नेतृत्वाखाली तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने ही संपूर्ण प्रक्रिया पार पाडली असून उपचारानंतर रुग्णाची प्रकृती सुधारत आहे.

केएलई रुग्णालय नेहमीच रुग्णांना दर्जेदार आणि परवडणारे उपचार देण्यासाठी कटिबद्ध असून या यशामुळे रुग्णालयाचा आत्मविश्वास अधिक वाढल्याची प्रतिक्रिया प्रशासक बसवराज बिरादार यांनी दिली.
या यशस्वी उपचार पद्धतीमुळे बेळगावसह परिसरातील रुग्णांना आता अशा जटिल उपचाऱ्यांसाठी मुंबई किंवा बेंगळुरू सारख्या मोठ्या शहरांमध्ये जाण्याची गरज उरलेली नाही. रुग्णालयात उपलब्ध असलेल्या जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा आणि तज्ज्ञ डॉक्टरांमुळे ही किमया साधणे शक्य झाले आहे.


Recent Comments