कर्नाटक युनिव्हर्सिटी एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह युनियनच्या निवडणुकीतील पराभव जिव्हारी लागल्याने एका उमेदवाराने धारवाडच्या रेणुकानगरमध्ये गळफास लावून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
धारवाडमधील कर्नाक विद्यापीठ कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत पराभूत झाल्याने धारवाडच्या रेणुका नगरमध्ये एका कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. चंद्रकांत सावळगी असे आत्महत्या केलेल्या उमेदवाराचे नाव आहे. दोनच दिवसांपूर्वी झालेल्या निवडणुकीत चंद्रकांत यांचा पराभव झाला होता. त्यामुळे प्रचंड नाराज झालेल्या चंद्रकांत सावळगी यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. याप्रकरणी धारवाड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Recent Comments