Dharwad

धारवाड नवलगुंद परिसरातील कापूस पिकावर चोरट्यांचा डल्ला

Share

घर, मठ , बँक एटीएम आणि इतर मंदिरांतून पैसे चोरणाऱ्या चोरट्यांनी आता शेतकऱ्यांच्या कापूस पिकावर डोळा ठेवला आहे.

होय, ही एक आश्चर्यचकित करणारी घटना आहे . धारवाड जिल्ह्यातील नवलगुंद तालुक्यातील बल्या गावात ही घटना घडली असून, गावातील मैलारप्पा कुरगुंद यांच्या एक एकर शेतातील कापूस चोरट्यांच्या टोळीने पळवून नेल्याची घटना घडली आहे. शेतकरी मल्लाप्पा शेतात एक एकरात पिकवलेला कापूस गायब झाल्याचे पाहून हैराण झाला आहे . अनेक अडचणींनंतर हाती पडणारे कापसाचे पीक आता शेतकऱ्याच्या हातातून निसटून चोरांच्या हातात गेले आहे. चोरांच्या या कृत्याने बल्या गावातील शेतकरी हैराण झाले आहेत. ही घटना नवलगुंद पोलीस ठाण्याच्या व्याप्तीत घडली.

आमचे पीक चोरीला गेल्याची ही इतक्या वर्षातील पहिलीच वेळ असून, चोरटयांनी , ऑटो रिक्षातुन येऊन कापूस वेचून पलायन केले आहे. 4 ते 5 क्विंटल कापूस चोरीला गेला. अशीच स्थिती राहिल्यास पिके कशी घेणार, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली. पोलीस विभागाने या चोरट्यांना जेरबंद करून कठोर कारवाई करावी अशी मागणी शेतकरी करीत आहे .

Tags: