केंद्रातील भाजप सरकारने विरोधी पक्षांच्या खासदारांच्या निलंबनाच्या निर्णयाचा निषेध करत काँग्रेस नेत्यांनी धारवाडमध्ये निषेध मोर्चा काढून आंदोलन केले.
हुबळी-धारवाड महानगर जिल्हा काँग्रेसच्या नेतृत्वाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला. काँग्रेस नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी भाजप विरोधात घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला. देशाच्या इतिहासात आतापर्यंत अनेक विरोधी खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. पण अशाप्रकारे बळजबरी निलंबन केले नव्हते.
याविरोधात एआयसीसी अध्यक्ष आणि केपीसीसी अध्यक्षांनी आंदोलनाचे आदेश दिले. त्यानुसार आंदोलन करत आहोत. केंद्रातील भाजप सरकार हुकूमशाही लादत आहे. विरोधी पक्षाच्या खासदारांवर निलंबनाचे हत्यार वापरणे सुरूच आहे. विरोधी पक्षाच्या प्रश्नांना उत्तरे न देण्याचे नरेंद्र मोदींचे वर्तन म्हणजे लोकशाहीची हत्या आहे. केंद्र सरकारने हे थांबवावे, अन्यथा असा तीव्र संघर्ष सुरू करावा लागेल, असा इशारा निदर्शक काँग्रेस नेत्यांनी दिला.


Recent Comments